दानपेटी फोडून तीस हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:29 IST2017-12-31T00:29:42+5:302017-12-31T00:29:49+5:30

घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी येथील तुळजा भवानी मंदिरातील दानपेटी पळवून चोरट्यांनी तीस हजार रुपये चोरून नेले.

Thirty thousand stolen from temple | दानपेटी फोडून तीस हजार लंपास

दानपेटी फोडून तीस हजार लंपास

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी येथील तुळजा भवानी मंदिरातील दानपेटी पळवून चोरट्यांनी तीस हजार रुपये चोरून नेले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
चोरट्यांनी मंदिराच्या गाभा-याचे दरवाजा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. दानपेटी चोरून मंदिराच्या मागील परिसरात नेली. तिथे दानपेटी फोडून त्यातील अंदाजे तीस ते पस्तीस हजारांची रक्कम लंपास केली. त्यानंतर रिकामी दानपेटी जागेवरच सोडून पोबारा केला. सकाळी घनसावंगी पोलिसांनी पंचनामा व गुन्हा दाखल केला. कॉन्स्टेबल एस. जी. राऊत तपास करीत आहेत.

Web Title: Thirty thousand stolen from temple