चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील एक लाखाची सोनसाखळी हिसकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 19:12 IST2019-06-18T19:11:33+5:302019-06-18T19:12:40+5:30
जैन मंदिर येथून दर्शन घेऊन फुलबाजाकडे जात असताना घडली घटना

चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील एक लाखाची सोनसाखळी हिसकावली
जालना : शहरातील काद्रराबाद येथील जैन मंदीरासमोर एका ७३ वर्षीय महिलेची गळ्यातील साखळी चोरट्यांनी हिसकवल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी रेखादेवी शांतीलाल छाबडा (७३. रा. छाबडा हॉस्पिटल जालना) यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेखादेवी छाबडा या सोमवारी सकाळी काद्रराबाद येथील जैन मंदिर येथून दर्शन घेऊन फुलबाजाकडे जात होत्या. त्याचवेळी जैनमंदीर येथे दुचाकीवरुन पाठीमागून आलेल्या दोन चोरट्यांनी गळ्यातील सोन्याची १ लाख २० हजारांची साखळी हिसकावून नेली. याप्रकरणी रेखादेवी छाबडा यांच्या फिर्यादीवरुन सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस हेडकॉस्टेबल दादासाहेब हरणे यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेकर करीत आहेत.