कुलुपबंद घर फोडून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 18:33 IST2021-02-03T18:32:52+5:302021-02-03T18:33:22+5:30

चोरट्यांनी सकाळच्या सुमारास घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

theft worth Rs 3 lakh to break into a locked house | कुलुपबंद घर फोडून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

कुलुपबंद घर फोडून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

ठळक मुद्दे गोपीकिशननगर भागात घडली घटना

जालना : घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडीकोंडा, कुलूप तोडून घरात प्रवेश करत लाकडी कपाटात ठेवलेले सोन्या, चांदीचे दागिने असा २ लाख ७४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना ३ फेब्रूवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास गोपीकिशननगर भागात घडली.

या प्रकरणी गोविंद रामप्रसाद पांडे (४६, व्यावसायीक चाट भंडार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी सकाळच्या सुमारास घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची अंगठी, सोन्याचे तुकडे, नथ, चांदीची देवाची मुर्ती रोख रक्कम असा २ लाख ७४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे. डिवायएसपी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, एपीआय रुपेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रुपेकर हे करीत आहेत.

Web Title: theft worth Rs 3 lakh to break into a locked house