सिमेंटच्या गोण्या चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:32 IST2021-04-23T04:32:48+5:302021-04-23T04:32:48+5:30

दुकानासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला जालना : दुकानासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २० एप्रिल रोजी अंबड ...

Theft of cement sacks | सिमेंटच्या गोण्या चोरीस

सिमेंटच्या गोण्या चोरीस

दुकानासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला

जालना : दुकानासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २० एप्रिल रोजी अंबड येथे घडली. याप्रकरणी ऋषिकेश जयनारायण गिल्डा यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नापोकॉ. फलटनकर आदी करत आहेत.

आदेशाचे उल्लंघन ; पाचजणांवर गुन्हा

जालना : सकाळी ११ नंतर दुकाने बंद करण्याचे आदेश असतानाही नियमांचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या पाचजणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून मोहम्मद नूर, सचिन ठोकर, रियान बागवान, साकिर बागवान, अफरोज बागवान, शफिक बागवान, नावेद बागवान (सर्व रा. जालना) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोना. नागरे करत आहेत.

Web Title: Theft of cement sacks