बसमध्ये चढताना चोरट्यांची हातचलाखी; प्रवास्याची दीड लाखांची सोनसाखळी हिसकावली

By दिपक ढोले  | Updated: August 11, 2022 17:11 IST2022-08-11T17:11:35+5:302022-08-11T17:11:58+5:30

जालना बसस्थानकावर आल्यावर जाफराबादकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना झाली चोरी

The sleight of hand of thieves while boarding a bus; A gold chain worth one and a half lakhs was seized from the passenger | बसमध्ये चढताना चोरट्यांची हातचलाखी; प्रवास्याची दीड लाखांची सोनसाखळी हिसकावली

बसमध्ये चढताना चोरट्यांची हातचलाखी; प्रवास्याची दीड लाखांची सोनसाखळी हिसकावली

जालना : बसमध्ये चढत असताना एका इसमाची सोन्याची साखळी हिसकावल्याची घटना जालना शहरातील बसस्थानक परिसरात गुरुवारी उघडकीस आली. २३.९३० ग्रॅमची १ लाख ३३ हजार रुपये किमतीची ही सोनसाखळी असून, याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अग्रसेननगर येथील सुनील मनबहाद्दूर लामा हे बुधवारी रात्री जाफराबाद येथे जात होते. जालना बसस्थानकावर आल्यावर जाफराबादकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना अज्ञाताने २३.९३० ग्रॅमची १ लाख ३३ हजार रुपये किमतीची साखळी हिसकावली. काही वेळानंतर सुनील लामा यांना साखळी चोरी झाल्याचे कळाले. त्यांनी तत्काळ सदर बाजार पोलिसांना याची माहिती दिली. सपोनि. पायघन, पोउपनि वाघ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता, आरोपी मिळून आला नाही. याप्रकरणी सुनील लामा यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोना वाघमारे हे करीत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: The sleight of hand of thieves while boarding a bus; A gold chain worth one and a half lakhs was seized from the passenger