जालन्यातून बेपत्ता झालेली मुलगी सापडली जळगाव रेल्वेस्थानकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 17:42 IST2022-01-24T17:39:51+5:302022-01-24T17:42:02+5:30
आईने दुकानातून सामान आणण्यासाठी सात वर्षीय मुलीला पाठविले होते.

जालन्यातून बेपत्ता झालेली मुलगी सापडली जळगाव रेल्वेस्थानकावर
जालना : जालना शहरातील रेल्वेस्थानक भागातून सात वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची काही दिवसापूर्वी घडली होती. या प्रकरणीत कदीम पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली होती. दरम्यान, कदीम पोलिसांनी तपास करुन या मुलीला जळगाव येथील रेल्वे स्थानकातून आणून पालकांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती कदीम ठाण्याचे पीएसआय मरळ यांनी दिली.
आईने दुकानातून सामान आणण्यासाठी सात वर्षीय मुलीला पाठविले होते. परंतु, यानंतर ती मुलगी घरीच आली नाही. या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहून मुलगी कुठे दिसतेय का, याचा शोध घेतला. परंतु, मुलगी आढळून आली नाही. त्या मुलीची ओळखपत्रकी करुन राज्यातील सर्वच ठाण्यांत पाठविली होती. दरम्यान, ही मुलगी जळगाव या ठिकाणच्या रेल्वे स्थानकात आल्याची माहिती मरळ यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तात्काळ तेथे जाऊन मुलीला ताब्यात घेतले. सदरील मुलीला पालकांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, डीवायएसपी नीरज राजगुरु, सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मरळ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली आहे.