शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंतरवाली सराटीतील शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना
By विजय मुंडे | Updated: September 8, 2023 20:02 IST2023-09-08T20:02:08+5:302023-09-08T20:02:35+5:30
हे शिष्टमंडळ आज रात्री छत्रपती संभाजीनगरहून विमानाने मुंबईला जाणार आहे.

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंतरवाली सराटीतील शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना
जालना : शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंतरवाली सराटीतील सात जणांचे शिष्टमंडळ शुक्रवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले आहे. या शिष्टमंडळाची शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंंत्र्यांशी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे.
हे शिष्टमंडळ आज रात्री छत्रपती संभाजीनगरहून विमानाने मुंबईला जाणार आहे. या शिष्टमंडळात शासकीय प्रतिनिधी म्हणून माजी मंत्री अर्जुन खोतकर, अंतरवाली सराटी येथील शेतकरी किरण तारख, उच्चशिक्षित तरूण पांडुरंग तारख, आंदोलक श्रीराम कुरणकर, तहसीलदार चंद्रकांत शेळके, सपोनि. प्रदीप एकशिंगे, आरक्षणासंदर्भातील तज्ज्ञ सदस्य सर्जेराव निमसे आदींचा समावेश आहे.