शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

खबऱ्यांसह टेम्पो चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:32 AM

उस्वद येथील पूर्णा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन करुन विक्रीसाठी मंठा शहरात वाहतूक करण्यासाठी, पोलीस व महसूल प्रशासनावर नजर ठेवणाऱ्या दोन खबऱ्यांसोबत वाळू खाली करुन परतणा-या टेम्पोवर मंठा ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा/तळणी : उस्वद येथील पूर्णा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन करुन विक्रीसाठी मंठा शहरात वाहतूक करण्यासाठी, पोलीस व महसूल प्रशासनावर नजर ठेवणाऱ्या दोन खबऱ्यांसोबत वाळू खाली करुन परतणा-या टेम्पोवर मंठा ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करुन १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मंठा शहरातील तुकाराम नगरात रात्रीच्या वेळी स्कॉर्पिओ (एम. एच. २८ व्ही ४४४४) पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभूवन यांना आढळून आली. स्कॉपिओ चालक संतोष सदानंद अमृतसागर (रा. खोरवड ) व सोबत अविनाश भीमराव सरोदे ( रा. उस्वद ) यांची चौकशी केली असता, वाळूची वाहतूक करणा-या वाहनधारकांना महसूल व पोलीस अधिका-यांची माहिती देण्ययासाठी पाळत ठेवून असल्याचे कबूल केले. तसेच उस्वद येथील गजानन जाधव यांचा टेम्पो (एम. एच. २८ एबी ८८२४) व सुधाकर सरोदे यांचा टेम्पो (एम. एच. २८ एबी ५०२३) हे वाळू टाकून रिकामा टेम्पो घेऊन परतले. तर एक टेम्पो वाळू खाली करुन परतणार असल्याची माहीती दिली. त्याच दरम्यान राम सरोदे यांचा टेम्पो (एम. एच. २१ बी एच ८३७५) हा वाळू खाली करुन परतताना आढळून आला. टेम्पोचालक भागवत गंगाधर चोले (रा. बन, ता. सेनगाव ) याला विचारले असता, घारे कॉलनीतील रोडवर वाळू खाली केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणीत एक ब्रास वाळूसाठा आढळला. याप्रकरणी संतोष अमृतसागर, अविनाश सरोदे, भागवत चोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.या कारवाईत जीप, टेम्पो व एक ब्रास वाळू असा एकूण १५ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पो. नि. त्रिभुवन यांनी दिली.जालना : जिल्ह्यात अवैध वाळू उपशाने कळस गाठला आहे. यावर महसूल तसेच पोलिसांकडून वारंवार कारवाई करूनही अवैध वाळू उपसा सुरू आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी भोकरदन तालुक्यातील एका वाळू माफियाविरूध्द एमपीडीए कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठविला होता. तो त्यांनी मंजूर केला असून, त्या वाळू माफियाची रवानगी हर्सूलच्या कारागृहात करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील रवींद्र रंगनाथ ठाले या वाळू माफियाविरूध्दाचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे पाठविला होता. तो त्यांनी लगेचच मंजूर केल्याने ठाले विरूध्द स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. ठालेला अटक करून त्याची एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर यांनी दिली. वारंवार वाळू उपसा न करण्यासह पोलीस, महसूल कर्मचा-यांना धमकावणे, तसेच त्यांना मारहाण करणे आदी प्रकार वाळू माफियांकडून सर्रासपणे केले जातात. पोलिसांच्या कारवाईमुळे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील वाळू माफियांमध्येही घबराट पसरली आहे. त्या भागातील वाळू माफिया देखील पोलिसांच्या रडारवर आहेत. सर्वात जास्त वाळूचा अवैध उपसा हा अंबड, घनसावंगी तालुक्यातील गोदावरी पात्रातून होतो आहे. त्या भागात खुद्द जिल्हाधिकारी बिनवडे आणि पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी स्वत: गोदावरी पात्रात धडक कारवाई केली होती.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीArrestअटक