विद्यार्थ्यांना अपयश पचवायला शिकवा -खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:36 AM2019-11-25T00:36:37+5:302019-11-25T00:36:55+5:30

आयुष्यात येणारे अपयश कसे पचवावे हेदेखील विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

Teach students to digest failure - Khotkar | विद्यार्थ्यांना अपयश पचवायला शिकवा -खोतकर

विद्यार्थ्यांना अपयश पचवायला शिकवा -खोतकर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिक्षणांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच आयुष्यात येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात, हे शिकवले पाहिजे. त्याचबरोबर आयुष्यात येणारे अपयश कसे पचवावे हेदेखील विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जालना आणि श्रीवर्धन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित कार्यक्रमात गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी खोरे प्राधिकरणाचे उपाध्यक्ष भास्कर आंबेकर, श्रीवर्धन फाऊंडेशनचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, सामाजिक कार्यकर्ते अन्वर सेठ, सिद्धीविनायक मुळे, जि.प. सदस्या गंगासागर पिंगळे, भाऊसाहेब घुगे, राजू वाघ, बाबुराव गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना राज्यमंत्री खोतकर म्हणाले, शिक्षक सामान्यपणे विद्यार्थ्यांना यश मिळवायलाच शिकवतो किंवा त्यासाठी सक्षम बनवतो. तथापी या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शिक्षकांनी अपयश पचवायला शिकवावे. जेणे करून त्यांना आयुष्यात कुठल्याही प्रकारच्या अपयशावर मात करता येईल, असेही ते म्हणाले.
तपूर्वी कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी नगराध्याक्षा संगीता गोरंट्याल, भास्कर आंबेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर उत्तम शैक्षणिक, सामाजिक कार्य करणा-या १७ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर ५ शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मंगेश जैवाळ, सूत्रसंचालन सीमा बिराजदार तर भगवान जायभाये यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास पोथरे, चंद्रशेखर ठाकूर, रवी तारो, जगन्नाथ शिंदे, गणेश तांबेकर, जगदीश भंगाळे, विशाल सिरसाट, संजय इंगळे, श्रीकांत रुपदे, सुनील साबळे, गणेश वानखेडे, संतोष देशपांडे, रविकांत जायभाये, आप्पासाहेब मुळे, कैलास उबाळे, भगवान राजगुरू, शामसुंदर उगले, संजय जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Teach students to digest failure - Khotkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.