उद्दिष्ट ३२ हजारांचे, लाभ मात्र ९ हजार जणांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:32 AM2019-02-17T00:32:36+5:302019-02-17T00:33:01+5:30

माता व बालकांच्या मृत्यू दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येत आहे.

The target is 32 thousand, the beneficiaries only 9,000 | उद्दिष्ट ३२ हजारांचे, लाभ मात्र ९ हजार जणांनाच

उद्दिष्ट ३२ हजारांचे, लाभ मात्र ९ हजार जणांनाच

Next

दीपक ढोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : माता व बालकांच्या मृत्यू दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याला २०१७-१८ या दोन वर्षांत ३२ हजार ६५९ लाभार्थ्यांचे उद्द्ष्टि होते. परंतु, त्यापैकी फक्त ९ हजार ८६८ लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळाला.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या स्थितीत ज्या महिला गर्भवती आहेत, त्यापैकी ५३ टक्के महिला पहिल्यांदाच गर्भवती झाल्या आहेत. या सर्व महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या पोर्टलनुसार, जिल्ह्याला जानेवारी २०१७ ते दिसेंबर २०१८ अखेरपर्यंत ३२ हजार ६५९ महिलांना या योजनेचा लाभ द्याचा होता. परंतु, ९ हजार ८६८ महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला.
टप्प्याने मिळतो लाभ
गर्भवती महिलेने गर्भावस्थेत स्वत: ची काळजी घ्यावी, पौष्टिक आहार मिळावा या उद्देशातून टप्याटप्याने लाभ देण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती, अनूसूचित जमाती, बीपीएल अशी अट ठेवण्यात आली आहे. पहिल्या बाळाच्या वेळी नोकरपेशातील, अंगणवाडी सेविका, सहायिका, आशा यांना लाभ देण्यात येतो. लाभार्थ्यांच्या बँक, डाक खात्यात हा लाभ जमा केला जातो.
यासाठी लाभार्थ्यांचा खाते क्रमांक व आधार क्रमांक आवश्यक आहे. गर्भवतीच्या नोंदणीच्यावेळी १ हजार रुपये तर सहा महिने पूर्ण झाल्यावर २ हजार रुपये देण्यात येते. प्रसूतीनंतर बाळाची जन्म नोंदणी व पेंटावैलेट-३ दिल्यानंतर १४ आठवडे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये देण्यात येते.

Web Title: The target is 32 thousand, the beneficiaries only 9,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.