खासगावात चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:35 IST2021-09-14T04:35:17+5:302021-09-14T04:35:17+5:30

माहोरा : जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला. दोन घरे फोडून जवळपास ७० हजार ...

A swarm of thieves in Khasgaon | खासगावात चोरट्यांचा धुमाकूळ

खासगावात चोरट्यांचा धुमाकूळ

माहोरा : जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला. दोन घरे फोडून जवळपास ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तर इतर पाच ठिकाणी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खासगाव येथील शंकर आटोळे यांच्या घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटात असलेले रोख ३० हजार रुपये हातोहात लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेख हसन शेख मस्तान यांच्या घराकडे वळविला. शेख यांच्या घरातून ५० हजारांची रोकड लंपास केली. मुलीच्या लग्नासाठी कटलरीचा व्यवसाय करून जमा केलेली रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्याशिवाय गावातील इतर पाच ठिकाणी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, घटनेनंतर बीट जमादार दादाराव सहाने, राजेंद्र दांडगे, पोहेकॉ तडवी व इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

फोटो

Web Title: A swarm of thieves in Khasgaon