शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

युवकाचा पुण्याजवळ संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:52 AM

कामानिमित्त पुणे परिसरात गेलेल्या टेंभुर्णी येथील एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : कामानिमित्त पुणे परिसरात गेलेल्या टेंभुर्णी येथील एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.टेंभुर्णी येथील सतीश अशोक सपकाळ (२३) हा युवक मागील तीन वर्षापासून कामाच्या निमित्ताने पुण्याजवळील शिरूर तालुक्यातील करड या गावी राहत होता. दरम्यान तो पाच सहा दिवसांपासून कामावर नसल्याची माहिती त्याच्या मालकाने टेंभुर्णी येथे त्याच्या आई- वडिलांना फोनवरून दिली होती. त्यात मंगळवारी त्याचा मृतदेह पूर्णत: कुजलेल्या अवस्थेत करड गावच्या शिवारात बाजरीच्या शेतात आढळल्याचे नातेवाईकांना समजले. ही माहिती समजताच टेंभुर्णी येथून त्याच्या नातेवाईकांनी करड या गावी जाऊन उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.मयत सतीशवर बुधवारी सकाळी टेंभुर्णी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, सतीशचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय नातेवाईक व्यक्त करीत असले तरी मृत्यूचे खरे कारण उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच समोर येणार आहे. मयत सतीशच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कामाच्या निमित्ताने सतीश शिरूर तालुक्यात गेला होता. त्याच्या अकाली निधनाने टेंभुर्णीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPuneपुणे