युवकाचा पुण्याजवळ संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:52 AM2019-08-31T00:52:57+5:302019-08-31T00:53:16+5:30

कामानिमित्त पुणे परिसरात गेलेल्या टेंभुर्णी येथील एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

Suspected death of youth near Pune | युवकाचा पुण्याजवळ संशयास्पद मृत्यू

युवकाचा पुण्याजवळ संशयास्पद मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : कामानिमित्त पुणे परिसरात गेलेल्या टेंभुर्णी येथील एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
टेंभुर्णी येथील सतीश अशोक सपकाळ (२३) हा युवक मागील तीन वर्षापासून कामाच्या निमित्ताने पुण्याजवळील शिरूर तालुक्यातील करड या गावी राहत होता. दरम्यान तो पाच सहा दिवसांपासून कामावर नसल्याची माहिती त्याच्या मालकाने टेंभुर्णी येथे त्याच्या आई- वडिलांना फोनवरून दिली होती. त्यात मंगळवारी त्याचा मृतदेह पूर्णत: कुजलेल्या अवस्थेत करड गावच्या शिवारात बाजरीच्या शेतात आढळल्याचे नातेवाईकांना समजले. ही माहिती समजताच टेंभुर्णी येथून त्याच्या नातेवाईकांनी करड या गावी जाऊन उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
मयत सतीशवर बुधवारी सकाळी टेंभुर्णी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, सतीशचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय नातेवाईक व्यक्त करीत असले तरी मृत्यूचे खरे कारण उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच समोर येणार आहे. मयत सतीशच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कामाच्या निमित्ताने सतीश शिरूर तालुक्यात गेला होता. त्याच्या अकाली निधनाने टेंभुर्णीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Suspected death of youth near Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.