शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

गळती असणाऱ्या मतदान केंद्रांना ताडपत्रीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:33 AM

पावसामुळे दक्षता म्हणून तालुक्यातील गळक्या मतदान केंद्रांवर ताडपत्री अंथरण्यात आली होती

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : मतदान प्रक्रियेच्या पूर्वसंध्येला रविवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. पावसामुळे दक्षता म्हणून तालुक्यातील गळक्या मतदान केंद्रांवर ताडपत्री अंथरण्यात आली होती. तर साहित्य वाटपाच्या सभागृहाबाहेर झालेल्या चिखलातूनच वाट शोधत अनेकांना मतदान केंद्र गाठावे लागले.भोकरदन विधानसभा मतदार संघात ३२२ मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये ३१ मतदान केंद्रे ही शहरी भागातील तर २९१ मतदान केंदे्र हे ग्रामीण भागातील आहेत. भोकरदन तालुक्यातील ११ मतदान केंद्रांची दयनीय अवस्था आहे. पाऊस सुरू झाला की, बोरगाव जहागीर, पिंपळगाव रेणुकाई, लेहा, रेलगाव, सिरसगाव मंडप, बाभुळगाव, खामखेडा, बोरगाव तारू, हिसोडा बु, मेरखेडा, डावरगाव, बोरगाव खडक, या अकरा मतदान केंद्रांची गळती थांबविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ताडपत्रीचे आवरणच पूर्ण इमारतीला देण्यात आले आहे. काही ठिकाणी पत्र्याचे छिद्र बुजविण्यासाठी एमसील वापरण्यात आले आहे. मात्र या मतदान केदं्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी गेलेल्या कर्मचारी व अधिका-याची रात्रीची झोपण्याची मोठी तारांबळ उडाली असल्याची माहिती आहे़उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सांगितले की, मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर साहित्यासह अधिकारी व कर्मचारी पोहोचले आहेत. पावसामुळे कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेतली आहे. जवखेडा ठेंगसह इतर काही मतदान केंद्रांवर साहित्य, कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस चिखलात फसली होती. मात्र त्या ठिकाणी तात्काळ दुस-या वाहनाची व्यवस्था करून सर्व मतदान केंद्रांवर साहित्य पोहोचविण्यात आले आहे. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRainपाऊस