शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
3
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
4
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
5
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
6
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
7
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
8
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
9
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
10
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
11
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
12
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
13
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
14
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
16
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
17
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
18
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
19
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
20
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

शेतीचे उत्पादन वाढीसाठी सुपर-२० कार्यक्रम; पेरणीपासून ते काढणीपर्यंत कृषी विभागाचे मार्गदर्शन

By महेश गायकवाड  | Updated: May 20, 2023 19:44 IST

शेती मशागत कामाला हात भार लावण्याकरिता कृषी विभागाने मागील दोन वर्षांत यांत्रिकीकरणावर भर दिला आहे.

जालना: यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी विभागाने २० कलमी कार्यक्रम आखला आहे. त्याची अंमलबजावणी यशस्वीरित्या करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहे. शेतकऱ्यांची खते, बि-बियाणे व किटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी कृषी सेवा केंद्रावर कडक नजर राहण्याबरोबरच शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणी पासून ते काढणीपर्यंत पीकनिहाय उत्पादनवाढीच्या सूत्राचे मार्गदर्शन कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी करणार आहेत.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम करणारा घटक आहे. त्यामुळे त्याचे योग्य नियोजन झाले तरच उत्पादनात वाढ होणार आहे. तालुक्यात सोयाबीनसह कपाशीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि इतर पिकांच्या पेऱ्यात उशीर झाला तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही. यावर्षी कापसाला अपेक्षित भाव मिळाला नाही. तरीसुद्धा कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. त्याचबरोबर कमी कालावधीत अधिकच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोयाबिनचा पेराही वाढणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

काय आहे सुपर-२० कार्यक्रमजालना जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी सर्व तालुक्यास खरीप हंगामाच्या नियोजनासाठी २० कलमी आराखडा आखून दिला आहे. यात प्रामुख्याने बीज उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, कृषी सेवा केंद्रनिहाय कृषी कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती करणे, जमिनीच्या सुपीकता निर्देशांकानुसार खत व्यवस्थापन, पीकनिहाय उत्पादनवाढीची सूत्रे या बाबींचा समावेश आहे. यांत्रिकीकरणावर भर देणारशेती मशागत कामाला हात भार लावण्याकरिता कृषी विभागाने मागील दोन वर्षांत यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. एकट्या जाफराबाद तालुक्यात  ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारासाठी ३६४ लाभार्थींना २ कोटी ६४ लाख, सिंचनासाठी (ठिबक व तुषार संच वगळता) २११९ लाभार्थींना ४ कोटी ३६ लाख, फलोत्पादन घटकासाठी २३१ लाभार्थींना १ कोटी ९२ लाख असे एकूण ८ कोटी ९२ कोटींचा निधी वितरित केला आहे.- संतोष गायकवाड, तालुका कृषी अधिकारी.

टॅग्स :JalanaजालनाagricultureशेतीFarmerशेतकरी