भोकरदन तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 14:26 IST2019-01-21T14:26:04+5:302019-01-21T14:26:56+5:30
आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही

भोकरदन तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
भोकरदन (जालना ) : तालुक्यातील सोयगाव देवी येथिल अमोल साहेबराव नेव्हार (२३) या युवकाने शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार एस एम केंद्रे करीत आहे. अमोल नेव्हार याचे गेल्या वर्षी लग्न झाले होते, आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही, त्याच्या पश्चात, पत्नी आई, वडील, भाऊ,भाऊजई असा परिवार आहे.