सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST2021-05-29T04:23:18+5:302021-05-29T04:23:18+5:30
मंठा शहरातील मार्केट यार्ड परिसरातील सोनूबाई ज्ञानेश्वर राठोड या विवाहित महिलेस पतीसह सासरच्या मंडळींनी माहेरहून दोन लाख रूपये ...

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
मंठा शहरातील मार्केट यार्ड परिसरातील सोनूबाई ज्ञानेश्वर राठोड या विवाहित महिलेस पतीसह सासरच्या मंडळींनी माहेरहून दोन लाख रूपये आणण्याची मागणी केली होती. माझ्या वडिलांकडे पैसे नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिला सतत शारीरिक व मानसिक त्रास दिला. तिला घरातून हकलून सुद्धा दिले होते. या जाचाला कंटाळून सोनूबाई राठोड या विवाहितेने गुरूवारी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पांडुरंग लक्ष्मण चव्हाण (रा. हेलस) यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पती ज्ञानेश्वर बापूराव राठोड, सासरा बापूराव चापला राठोड, सासू कासाबाई बापूराव राठोड, सासू धोंडीबाई बापूराव राठोड, भाया मोहन बापूराव राठोड, भाया बाबू बापूराव राठोड, भाया तुकाराम बापूराव राठोड, जाऊ शिल्पाबाई तुकाराम राठोड, जाऊ शीलाबाई मोहन राठोड, जाऊ पारुबाई बाबूराव राठोड (सर्व रा. मंठा) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि गुट्टुवार व पोकॉ शाम गायके हे करत आहेत.