शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसाला एका शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST

दीपक ढोले जालना : अनेक संकटांशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाचाही मुकाबला सुरू केला आहे. मात्र, असे असले तरी ...

दीपक ढोले

जालना : अनेक संकटांशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाचाही मुकाबला सुरू केला आहे. मात्र, असे असले तरी गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १०५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.

नैसर्गिक, सुलतानी संकट, शेतमालाला नसलेला भाव, कर्जाचा डोंगर अशा अनेक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला जीवनप्रवास थांबविला आहे. २००१ ते २०२० या काळात चार हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वीस वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या कमी हव्यात, यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या गेल्या. मात्र, यातील किती योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ झाला, यावर वाद-विवाद सुरूच आहे. असे असले तरी शेतकऱ्यांमागे लागलेले समस्यांचे शुक्लकाष्ठ काही संपलेले नाही. कधी अस्मानी, तर कधी सुलतानी अशा संकटात शेतकरी कायमच अडकलेला आहे. यंदा तर कोरोनाच्या संकटातही शेतकरीच अधिक भरडला जात आहे.

कोरोनामुळे शेतकरी अडचणीत

रब्बी हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना या काळातील पीक एकतर कवडीमोल भावाने विकण्याची, तर काहींवर अक्षरश: फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी या काळातही अडचणीत आला आहे. देशात लॉकडाऊन असताना शेतकरी आपल्या शेतातील माल विकावा कसा, या मानसिकतेत होते. यामुळेच मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील १०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

१०५ पैकी ९० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळाला लाभ

जिल्ह्यात वर्षभरात १०५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे एक लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. वर्षभरात १०५ पैकी ९० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

आकडेवारी

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या १०५

योजनेसाठी पात्र ठरलेले शेतकरी - ९०

आलेख काढावा

मागील आठ महिन्यांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या

सप्टेंबर

१०

ऑक्टोबर

१४

नोव्हेंबर

०५

डिसेंबर

०७

जानेवारी

०८

फेब्रुवारी

०३

मार्च

०४

एप्रिल

००