ऑनलाईन रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 04:04 IST2021-01-05T04:04:53+5:302021-01-05T04:04:53+5:30
बदनापूर शहरामध्ये काँग्रेसची आढावा बैठक बदनापूर : आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष निरीक्षक लक्ष्मण घुमारे यांच्या उपस्थितीत काॅंग्रेसची ...

ऑनलाईन रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश
बदनापूर शहरामध्ये काँग्रेसची आढावा बैठक
बदनापूर : आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष निरीक्षक लक्ष्मण घुमारे यांच्या उपस्थितीत काॅंग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी काँग्रेस अनूसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंबुरे, राजेंद्रकुमार जयस्वाल, नगरसेवक जावेद कुरेशी उपस्थित होते. या बैठकीत पक्षबांधणी आणि निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.
लांडग्यांच्या दहशतीमुळे पशुपालक चिंतेत
भोकरदन : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून लांडग्यांनी दहशत निर्माण केली आहे. लांडग्यांच्या हल्ल्यात काही पशूंचा मृत्यू झाला आहे. लांडगे पशुधनावर हल्ला करत असल्याने शेतकरी, पशुपालक चिंतेत आहेत. वन विभागाने लांडग्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
सर्दी, खोकल्याच्या रूग्णसंख्येत वाढ
जालना : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, ही कोरोनासदृश्य लक्षणे असल्याने अनेकांनी खासगी दवाखान्यात उपचार घेण्यावर भर दिला आहे. या आजारासह इतर आजारही वाढले आहेत.
शहर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक जोमात
परतूर : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वाढलेले अपघात पाहता, अवैध प्रवासी वाहतुकीवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.