पथदिवे दिवसाही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:16+5:302021-02-07T04:28:16+5:30
राेहित्र जळाल्याने गैरसोय बदनापूर : तालुक्यातील बाजार गेवराई येथील बाजार गल्ली परिसरातील सिंगल फेज रोहित्र जळाले आहे. त्यामुळे या ...

पथदिवे दिवसाही सुरू
राेहित्र जळाल्याने गैरसोय
बदनापूर : तालुक्यातील बाजार गेवराई येथील बाजार गल्ली परिसरातील सिंगल फेज रोहित्र जळाले आहे. त्यामुळे या भागातील बँकांचे कामकाज ठप्प झाले असून, याचा नाहक त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे रोहित्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
नळगे, कठुरे यांची निवड
परतूर : येथील शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश नळगे तर सचिवपदी शुभम कठुरे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी गजानन चवडे, सोनपावले टाकले, कार्यवाह राहुल कदम, संघटकपदी सुरेश मोरे यांची निवड झाली.
अंगणवाडी सेविकांना लस
जालना : तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील अंगणवाडी सेविकांना शुक्रवारी कोरोनाची लस देण्यात आली. यावेळी सविता राऊत, लंक, सय्यद, नजिमा आदींची उपस्थिती होती. सर्व संबंधितांनी लस वेळेत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
ठिकठिकाणी कचरा
जालना : शहरांतर्गत भागात ठिकठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर कचरा साचत आहे. घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने नागरिक हा कचरा रस्त्यावर फेकून देत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.