पथदिवे दिवसाही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST2021-03-07T04:27:19+5:302021-03-07T04:27:19+5:30

पदाधिकाऱ्यांचा सत्कार भोकरदन : तालुक्यातील वरूड येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवींद्र वाघ यांचा निवडीनंतर सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ...

Streetlights continue throughout the day | पथदिवे दिवसाही सुरूच

पथदिवे दिवसाही सुरूच

पदाधिकाऱ्यांचा सत्कार

भोकरदन : तालुक्यातील वरूड येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवींद्र वाघ यांचा निवडीनंतर सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ठगणाबाई धनराज, कलाबाई वाघ, लक्ष्मी बावस्कर, अनिता धनराज व इतरांची उपस्थिती होती.

गुटखाविक्री जोमात

अंबड : राज्य शासनाने गुटखा विक्रीला कायदेशीर बंदी घातली आहे. परंतु, अंबड व परिसरात सध्या खुलेआम गुटख्याची विक्री सुरू आहे. ही बाब पाहता अन्न व औषध प्रशासनाने कारवाई मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

मेंढपाळांची भटकंती

भोकरदन : यंदा अनेकांनी कपाशी मोडून गव्हाची पेरणी केली आहे. त्यामुळे कापसाचे मोकळे रान मिळत नसल्याने या भागातील मेंढपाळांची भटकंती सुरू आहे. शेत मिळत नसल्याने गायरानात ही मेंढरे सोडली जात आहेत.

ठिकठिकाणी अस्वच्छता

जालना : शहरांतर्गत भागातील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे पडणारा कचरा वेळेत उचलावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Streetlights continue throughout the day