जालन्यात सरळ लढतीमुळे चुरस कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 05:35 AM2019-10-19T05:35:45+5:302019-10-19T05:36:02+5:30

जुनेच पत्ते । खोतकर-गोरंट्याल, लोणीकर-जेथलिया, टोपे-उढाण, कुचे-चौधरी आणि दानवे-दानवे अशी लढत

Straight from the fiery battle, Churus remained | जालन्यात सरळ लढतीमुळे चुरस कायम

जालन्यात सरळ लढतीमुळे चुरस कायम

Next

जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदार संघ आहेत. २०१४ च्या निवडणुकीत जे प्रमुख उमेदवार होते. तेच पुन्हा मैदानात आहेत. सरळ लढती होत असल्यातरी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार किती आणि कोणाचे मते स्वत:कडे खेचतात यावर बरेच काही अवलंबून आहे.


पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला जालना जिल्हा आता युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. केंद्रात रावसाहेब दानवे यांच्या रुपाने मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे तर राज्याच्या मंत्रिमंडळात बबनराव लोणीकर हे कॅबिनेट तर शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे राज्यमंत्री म्हणून आहेत. रावसाहेब दानवे गेली साडेचार वर्ष भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. लोकसभेत जालना जिल्ह्यातील मतदारांनी भाजपला साथ दिली. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. परंतु अशाही स्थितीत जालन्यात काँग्रेसचे कैलास गोरंट्याल तसेच घनसावंगीत राजेश टोपे आणि परतूरमधून सुरेशकुमार जेथलिया हे युतीच्या उमेदवारांना टक्कर देत आहेत. जालन्यातील खोतकर विरुध्द गोरंट्याल ही लढत अटीतटीची होणार असून घनसावंगीतही अशीच चुरस निर्माण झाली आहे.


परतूरमध्ये जेथलियांनी लोणीकरांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळेच थेट पंतप्रधान मोदी यांनाच परतूरमध्ये सभा घ्यावी लागली. या सभेचा मतांवर किती परिणाम होतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
भोकरदनमध्ये संतोष दानवे विरुध्द माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्यात लढत होत आहे. बदनापूरमध्ये भाजपचे आ. नारायण कुचे विरुध्द राष्टÑवादीचे बबलू चौधरी लढत होत आहे.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
१) नागरी समस्या आणि दुष्काळामुळे होरपळलेला बळीराजा
२) जिल्ह्यातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शैक्षणिक गुणवत्ता
३) सत्ताधाऱ्यांचा जिल्हा असतानाही विकासापासून कोसोदूर; विरोधकांचा आरोप
४) जालन्यातील पाणीप्रश्न आणि पालिकेतील राजकारण


रंगतदार लढती
ाालन्यात खोतकर विरुध्द गोरंट्याल ही सर्वाधिक रंगतदार लढत होण्याची चिन्हे आहेत. दोघेही जण २० वर्षांपासून कधी ना कधी एकमेकांसमोर आलेले आहेत. या निवडणुकीत खोतकरांना रावसाहेब दानवेंची साथ कशी मिळते यावर त्यांचे भवितव्य अंवलबून असल्याचे दिसते.
परतूर मतदार संघात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर विरुध्द माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया ही लढत लक्षणीय ठरणार आहे. वंचितचा उमेदवार किती मते घेतो यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
घनसावंगी मतदार संघात आ. राजेश टोपे विरुध्द शिवसेनेचे हिकमत उढाण यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षीत आहे. टोपे हे १९९९ पासून या मतदार संघाचे नेतृत्व करतात. ते बारा वर्षे मंत्री म्हणून राहीले आहेत. अशाही स्थितीत टोपे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बांधकाम व्यावसायिक हिकमत उढाण यांनी स्वतंत्र रणनीती आखली आहे.

Web Title: Straight from the fiery battle, Churus remained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.