जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे असतील, हे थांबले नाही तर वेगळा निर्णय घेऊ: मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: October 30, 2023 18:53 IST2023-10-30T18:52:03+5:302023-10-30T18:53:31+5:30

जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असावेत असा अंदाज मनोज जरांगे यांनी वर्तवला आहे

Stop the arson or I will have to make a different decision; Warning of Manoj Jarange | जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे असतील, हे थांबले नाही तर वेगळा निर्णय घेऊ: मनोज जरांगे

जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे असतील, हे थांबले नाही तर वेगळा निर्णय घेऊ: मनोज जरांगे

जालना : आज रात्री आणि उद्या रात्रीपर्यंत जाळपोळ बंद करा, अन्यथा उद्या रात्री मला नाविलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असावेत असा अंदाज आहे. सत्ताधाऱ्यांचे असाल, नसाल तरीही जाळपोळ बंद करा, अशी सादही मनोज जरांगे पाटील यांनी घातली.

करोडोंच्या संख्येने असलेल्या गोरगरिब मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपला शांततेत लढा सुरू आहे. परंतु, काही ठिकाणी होणारी जाळपोळ, उद्रेक पाहता थोडी शंका येत आहे. गोरगरिबांच्या हक्कासाठी हा लढा आहे. त्यामुळे जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका. आज रात्री, उद्या दिवसा मला कुठेही जाळपोळ केलेले किंवा नेत्यांच्या घरी गेल्याची बातमी आली तर मला उद्या रात्री प्रेस घेवून वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. 

जाळपोळीला आपले समर्थन नाही. बहुतेक सत्ताधाऱ्यांतीलच लोक कार्यकर्त्यांच्या हाताने घरे जाळून घेतायत आणि मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनाला डाग लावतायत, असा अंदाज आहे. आपल्याला आरक्षण मिळणार. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात सरकार जेरीस येणार आहे. आपल्या दारात कोणीही यायचे नाही त्यांच्या दारात कशामुळे जातोय आपण असा सवाल करीत तुम्ही सत्ताधाऱ्यांचे असो किंवा सामान्य मराठा असोत तुम्ही सांगितल्यानुसार शांततेत आंदोलन करा, जाळपोळ करू नका, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.

Web Title: Stop the arson or I will have to make a different decision; Warning of Manoj Jarange