गुंडेवाडी शिवारात एकाचा दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:29 IST2018-04-02T00:29:22+5:302018-04-02T00:29:22+5:30

गुंडेवाडी शिवारातील संतोष जिनिंग परिसरात एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली.

 A stone crushed murder in the Gundewadi Shivar | गुंडेवाडी शिवारात एकाचा दगडाने ठेचून खून

गुंडेवाडी शिवारात एकाचा दगडाने ठेचून खून

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तालुक्यातील गुंडेवाडी शिवारातील संतोष जिनिंग परिसरात एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. मृत व्यक्तची ओळख पटलेली नसून, या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंडेवाडी शिवारातील संतोष जिनिंग लगत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी चंदनझिरा पोलिसांना दिली.
माहिती मिळताच चंदनझिरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश गावडे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. मृत व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच मृतदेह कुजलेला असल्याने ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
पोलिसांनी आजूबाजूला चौकशी करून मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृत व्यक्तीस ओळखत नसल्याचे स्थानिकांंनी सांगितले.
घटनास्थळ पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी कॉन्स्टेबल राम शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक व्ही. एस. पाटील तपास करीत आहेत.

Web Title:  A stone crushed murder in the Gundewadi Shivar