शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

राहेरी येथे चोरली जीप; नेवासा, नळदुर्ग येथील सराफा दुकाने लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 1:10 AM

शुक्रवारी रात्री जालना शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बुलडाणा जिल्ह्यातील राहेरी येथे चोरलेल्या जीपचा वापर करून चोरट्यांनी नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील सराफा दुकान लुटले. तसेच नेवासा येथील सराफा, किराणा दुकान लुटले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री जालना शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. या कारवाईत जीपसह ४ लाख १५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जालना येथील एडीएसचे (दरोडा प्रतिबंधक पथक) पो.नि. यशवंत जाधव व त्यांचे सहकारी शुक्रवारी रात्री शहरात गस्त घालत होते. मस्तगड येथून गुरूग्लोबल स्कूलकडे जात असताना रमेश मुळे यांच्या शेतातून सहा ते सात जण हातात धारदार शस्त्रे घेऊन जाताना दिसले. पोलिसांची चाहूल लागताच त्या सात जणांनी जवळच उभ्या असलेल्या जीपमधून पळ काढला. त्यावेळी पथकाने जीपचा पाठलाग करून मंठा ते अंबड चौफुली मार्गावर जीपसमोर वाहन लावून जीपमधील चौघांना ताब्यात घेतले. जीपची तपासणी केली असता आतमध्ये एक तलवार, कुलूप तोडण्याची लोखंडी कटर, दोरी व इतर साहित्य आढळून आले.पोलिसांनी किशोरसिंग उर्फ टकल्या रामसिंग टाक, दियासिंग बरीहमसिंग कलाणी (दोघे रा. जालना), गजानन सोपान शिंगाडे (रा. पाचनवडगाव ता. जि. जालना), अनिल गोरखनाथ वलेकर (रा. काजळा ता. बदनापूर जि. जालना) यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून जीपसह ४ लाख १५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे पोनि. यशवंत जाधव, कदीम ठाण्याचे पोनि. देविदास शेळके, पोहेकॉ. ज्ञानदेव नांगरे, पोहेकॉ नंदू खंदारे, पोना. किरण चव्हाण, पोकॉ. सचिन आर्य, पोकॉ. संदीप चिंचोले, पोकॉ. विजय निकाळजे, विजय निकाळजे, पोना गणेश जाधव, कृष्णा चव्हाण, रमेश काळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी पोहेकॉ नागरे यांच्या तक्रारीवरून कदीम पोलीस ठाण्यात वरील चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि सोनवळे हे करीत आहेत.तिघांनी काढला पळएडीएस व कदीम पोलिसांनी जीप अडविल्यानंतर जीपमधील सातपैकी चौघांना ताब्यात घेण्यात आले. तर अंधाराचा फायदा घेत तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. या तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सराफाचे दुकान हेच लक्ष्यपोलिसांनी जेरबंद केलेले आरोपी अधिक प्रमाणात सोनाराची दुकाने टार्गेट करून चोरी करीत असल्याचे समोर आले आहे. या चोरट्यांनी आजवर अनेक सराफाची दुकाने फोडली असून, चोऱ्यांसह इतर अनेक गुन्हेही जालन्यासह औरंगाबाद, बुलडाणा, नगर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्याकडून इतर गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.महाराष्ट्र बँक शाखेचे शटर तोडलेया चोरट्यांनी राहेरी (जि. बुलडाणा) येथून काही दिवसांपूर्वी एक जीप चोरली होती. या जीपचा वापर करून नेवासा येथील सोनाराचे दुकान व किराणा दुकान फोडले. औरंगाबाद पासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील महाराष्ट्र बँकेचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच नळदुर्ग (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) येथील सराफा दुकान फोडल्याची कबुली या चोरट्यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :ArrestअटकDacoityदरोडाRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस