आरक्षणाबाबत तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST2021-02-06T04:56:24+5:302021-02-06T04:56:24+5:30

वाहतूक कोंडी कायम बदनापूर : शहरातील बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. अनेक वाहन चालक रस्त्यावर वाहने उभी ...

Statement to Tehsildar regarding reservation | आरक्षणाबाबत तहसीलदारांना निवेदन

आरक्षणाबाबत तहसीलदारांना निवेदन

वाहतूक कोंडी कायम

बदनापूर : शहरातील बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. अनेक वाहन चालक रस्त्यावर वाहने उभी करीत असून, पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

फुटबॉल स्पर्धेत जालना संघाला विजेतेपद

जालना : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कळंब (जि. उस्मानाबाद) येथे आयोजित फुटबॉल स्पर्धेत जालना संघाने विजेतेपद पटकाविले. या खेळाडूंना घोरफडे मेमोरिअल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुमंत घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी संघातील खेळाडूंचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

अवैध वाळू उपसा थांबविण्याची मागणी

भोकरदन : भोकरदन तालुक्यातून वाहणाऱ्या गिरजा- पूर्णा नद्यांचे पात्र वाळू माफियांकडून पोखरले जात आहे. या भागातील नदीपात्रांमध्ये राजरोस अवैध वाळू उपसा सुरू आहे. अनेक वाहन चालक ग्रामीण भागातून वाळूची चोरटी वाहतूक करीत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने अवैध वाळू उपसा, वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

अंबड : कोरोनाच्या काळात ग्राहकांना सेवा दिल्याबद्दल येथील राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बजरंग सेनेच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पोनि. अनिरूध्द नांदेडकर, डॉ. भागवत कटारे, कल्याण जोशी, डॉ. यशवंत कुलकर्णी, शिवाजी बजाज, साध्वी धर्मसिंहनी, गायत्री दीदी, प्रमोद राऊत, किरण मुंडलिक, तेजस मंडलिक आदींची उपस्थिती होती.

Web Title: Statement to Tehsildar regarding reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.