ग्रामस्थांना मोफत नळ कनेक्शन देण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:33 AM2021-03-09T04:33:32+5:302021-03-09T04:33:32+5:30

पिंपळगाव रेणुकाई हे तालुक्यातील मोठी व दाट लोकसंख्या असलेले गाव आहे. या ठिकाणी ११९३ कुटुंबे वास्तव्यास आहेत. तत्कालीन ग्रामपंचायतीने ...

Start giving free tap connections to villagers | ग्रामस्थांना मोफत नळ कनेक्शन देण्यास प्रारंभ

ग्रामस्थांना मोफत नळ कनेक्शन देण्यास प्रारंभ

Next

पिंपळगाव रेणुकाई हे तालुक्यातील मोठी व दाट लोकसंख्या असलेले गाव आहे. या ठिकाणी ११९३ कुटुंबे वास्तव्यास आहेत. तत्कालीन ग्रामपंचायतीने गावात ठिकठिकाणी लोखंडी पाइपलाइन अंथरुण जवळजवळ ८७१ कुटुंबांना नळजोडणी करून दिली होती. त्यामुळे गावात सर्वांना समांतर पाणीपुरवठा होत होता; परंतु मागील काळात कोरोनामुळे काही ग्रामस्थांची नळजोडणी करणे बाकी असल्याने उर्वरित नागरिकांना मोफत नळ कनेक्शन देण्याचा पुढाकार नुकत्याच निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायतीने घेतला आहे. ग्रामसेवक भागाजी सुरडकर व सरपंच पंचफुला बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेला शनिवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. १५ व्या वित्त आयोगातून ही मोफत नळजोडणी देण्यात येणार आहे. या कामाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संदीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी बी. जी. सुरडकर, पोलीसपाटील गणेश निकम, ग्रामपंचायत सदस्य इरफान पटेल, ग्रामस्थ संतोष बोर्डे‌, विठ्ठल नरवाडे, विजय देशमुख, मधुकर दांडगे, ग्रामपंचायत कर्मचारी विनोद आहेर, प्रभाकर आहेर सास्ते आदी उपस्थित होते.

===Photopath===

080321\08jan_20_08032021_15.jpg

===Caption===

ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थांना मोफत नळ जोडणी करून देत आहेत.

Web Title: Start giving free tap connections to villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.