राममूर्ती येथे लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST2021-06-01T04:22:49+5:302021-06-01T04:22:49+5:30

४५ वर्षांपुढील नागरिकांनी सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात जास्त प्रमाणात दिसत आहे. अशा ...

Spontaneous response to the vaccination campaign at Ramamurthy | राममूर्ती येथे लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

राममूर्ती येथे लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

४५ वर्षांपुढील नागरिकांनी सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात जास्त प्रमाणात दिसत आहे. अशा परिस्थितीत लसीकरण हा एकमेव पर्याय आहे, म्हणून गावातील युवकांच्या पुढाकारातून राममूर्ती येथे लसीकरण पार पडले. यावेळी सरपंच विकास मगर, रामकिसन मुळे, सुरेश रोडगे, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर चौधरी, भगवान गिराम, राधाकिसन राऊत, अर्जुन शिमगे, संगीता पाखरे, वर्षा लोणकर, डॉ. प्रेम भारती, दयानंद बनसोडे, आशा सेविका मुक्ता गिराम, संगीता जाधव, आदींची उपस्थिती होती. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी संदीप मगर, भरत लकडे, विष्णू मगर, कैलास मगर, सतीश कावळे, डिगंबर लकडे, बंडू केरकळ, किशोर गिराम, विकास कदम आदींनी परिश्रम घेतले.

फोटो

Web Title: Spontaneous response to the vaccination campaign at Ramamurthy