भरधाव खाजगी बस ट्रकवर आदळली; बसमधील क्लीनर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 15:04 IST2022-02-10T15:03:39+5:302022-02-10T15:04:00+5:30
जालना-औरंगाबाद महामार्गावरील नूर हॉस्पिटल समोर गतिरोधक असून येथे कसलाही सूचना फलक नाही.

भरधाव खाजगी बस ट्रकवर आदळली; बसमधील क्लीनर ठार
बदनापूर ( जालना ) - तालुक्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील वरुडी शिवारनजीक खाजगी बस आणि ट्रकच्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान झाला. खाजगी बसने ट्रकच्या पाठीमागील बाजूवर धडकली असून यात बसचा क्लीनर ठार झाला आहे.
आज पहाटे एक खाजगी बस (क्रमांक एम एच २९ एएन-७००० ) औरंगाबादकडे जात होती. साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील वरुडी शिवारात गतिरोधकाजवळ खाजगी बसने ट्रकला ( क्रमांक एम एच १८ बीजी ८९३५ ) पाठीमागून जोराची धडक दिली. जोरदार धडकेमुळे बसची समोरची बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. यात बसमधील क्लीनर संदीप विष्णुपंत हांडे ( ४५, यवतमाळ ) हा गंभीर जखमी होऊन ठार झाला. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अंकुश सत्यनारायण दासर यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात खाजगी बस चालक जानरा गणपतराव शिनगारे ( रा. बाणगाव तालुका नेर जिल्हा. यवतमाळ ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गतिरोधक सूचना फलक नाही
जालना-औरंगाबाद महामार्गावरील नूर हॉस्पिटल समोर गतिरोधक आहे. येथे कसल्याची प्रकारचे पांढऱ्या रंगाचे पट्टे, रेडियम सूचनाफलक किंवा गतिरोधकबाबत माहिती नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी वाहन धारकांमधून होत आहे.