शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्पांची तहान कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:15 IST

भोकरदन तालुका वगळता इतरत्र दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ६४ पैकी तब्बल ४१ प्रकल्प आजही कोरडेठाक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळ्याचा एक महिना लोटत आला आहे. मात्र, भोकरदन तालुका वगळता इतरत्र दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ६४ पैकी तब्बल ४१ प्रकल्प आजही कोरडेठाक आहेत. तर २० प्रकल्पांमध्ये मृतपाणीसाठा आहे. पावसाअभावी प्रकल्पांची तहान अन् गावा-गावातील पाणीटंचाई कायम आहे.गतवर्षी अपुऱ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागला. पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून टँकरसह अधिग्रहणावर लाखो रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. यंदा जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. मात्र, भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांची तहानही कायम आहे. जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांपैकी एक मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. तर चार प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे. केवळ दोन प्रकल्पांमध्ये ७६ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. यात भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात सद्यस्थितीत ५.१८ दलघमी म्हणजे ८५.९५ टक्के पाणी उपलब्ध आहे. गत आठवड्यात या प्रकल्पात केवळ १.२२ दलघमी पाणी उपलब्ध होते. तर धामणा प्रकल्पात ८.५१ दलघमी म्हणजे ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर जिल्ह्यात ६४ लघू प्रकल्प आहेत. पैकी ४१ प्रकल्प पूर्णत: कोरडेठाक पडले आहेत. २० प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. एका प्रकल्पात ० ते २५ दलघमी पाणी उपलब्ध आहे. पावसाअभावी प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. परिणामी प्रकल्पांवर आधारित असलेल्या शेकडो गावांसह शहरी भागातील पाणी प्रश्न कायम आहे.५ टक्के उपयुक्त पाणीसाठा : केवळ १५ टक्के पाऊसजिल्ह्यातील सात पैकी केवळ दोन मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पात एकूण १८.७४ टक्के पाणी उपलब्ध आहे. तर लघू प्रकल्पात ०.०४ टक्के पाणी असून, जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण ५.४३ टक्के उपयुक्त पाणी उपलब्ध आहे.गतवर्षी याच कालावधीत प्रकल्पांमध्ये केवळ ७.७८ दलघमी म्हणजे ३.२७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १२.९० दलघमी म्हणजे ५.४३ टक्के पाणीसाठा झाला असून, गतवर्षीपेक्षा २.१६ .टक्यांनी साठा वाढला आहे.भोकरदन तालुक्यात पाणीच पाणीभोकरदन तालुक्यात आजवर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिणामी जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी केवळ भोकरदन तालुक्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये क्षमतेच्या ७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. इतर तालुक्यातील प्रकल्पांमध्ये अद्यापही ठणठणाट आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीriverनदीdroughtदुष्काळDamधरण