शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टिप्परच्या धडकेत सहा महिन्यांची गर्भवती महिला पतीसह ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 16:57 IST

रुग्णालयातून नियमित तपासण्या करून दोघे घराकडे परतत होते

ठळक मुद्देटिप्पर चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

जालना : जालना-भोकरदन रोडवरील गुंडेवाडी शिवारात टिप्परने दुचाकीला धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. २७ ) दुपारी घडली. या अपघातात योगेश गणेश बोडखे (२५, रा. जानेफळ ता. भोकरदन) हे जागीच ठार झाले. तर त्यांची गर्भावाटी पत्नी गिता (२०) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश बोडखे हे आपल्या आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नी गिता यांची जालना येथून वैद्यकीय तपासणी करून दुचाकीवरुन (एमएच-२१,एजे- ५०६४) जानेफळकडे जात होते. यावेळी घाणेवाडीकडून जालन्याकडे गाळ घेऊन येणाऱ्या भरधाव टिप्परने  (एमएच-१८, एम-५०२३) ने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर टिप्पर जवळच्या कारखान्याच्या भिंतीवर जाऊन धडकला. अपघातात दुचाकी चालक योगेश हे जागीच ठार झाले आहे.  गंभीर जखमी अवस्थेत गीतावर जालना येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबादला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी टिप्पर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो दारूच्या नशेत असल्याचे समजते.अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी   अनिल काळे, भरत कडूळे, कृष्णा भडंगे यांनी जखमींना दवाखान्यात नेले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसJalanaजालना