साहेब शेतकऱ्यांसाठी काही तरी करा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:51 IST2018-04-05T00:51:05+5:302018-04-05T00:51:05+5:30
कुटुंबातील कर्ता पुरुष तर गेला. साहेब आता तरी शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी काहीतरी करावे, अशा भावना या कुटुंबियांनी प्रशासनातील अधिका-यांसमोर मांडल्या.

साहेब शेतकऱ्यांसाठी काही तरी करा...
लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : कुटुंबातील कर्ता पुरुष तर गेला. साहेब आता तरी शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी काहीतरी करावे, अशा भावना या कुटुंबियांनी प्रशासनातील अधिका-यांसमोर मांडल्या.
घनसावंगी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांशी बुधवारी तहसीलदार आश्विनी डमे यांच्यासह महसूलच्या सात पथकांनी उभारी कार्यक्रमाअंतर्गत प्र्रत्यक्ष संवाद साधला. तालुक्यातील २०१२ पासून आत्महत्या केलेल्या २४ शेतक-यांच्या कुटुंबियांना शासनाच्या विविध योजना मिळाव्यात, त्यांचे आर्थिक मागासलेपण जाउन आर्थिक स्थैर्य कशा प्रकारे देता येईल या उद्देशाने उभारी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
बुधवारी चिंचोली, राजेगाव, जोगलादेवी, कंडारीपरतूर, भेंडला, हातडी, वडीरामसगाव, रांजणवाडी, देवीदाहेगाव, सिंदखेड, अंतरवलीराठी, चित्रवडगाव, बोररांजणी, देवहिवरा, अंतरवली टेभी, मूर्ती राजाटाकळी, तीर्थपुरी, या गावातील जावून तहसीलदार अश्विनी डमरे, मंडळाधिकारीघनवट तलाठी यांच्यासह महसूलच्या अधिका-यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या मागण्या शासनाबरोबर सेवाभावी संस्थांकडून कशा पूर्ण करून घेता येईल याचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे तहसीलदार डमरे यांनी सांगितले.