शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

'साहेब, मदत साऱ्यांनाच मिळायला पाहिजे'; दानवेंवर शेतकऱ्यांनी केला प्रश्नांचा भडीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:43 IST

प्रत्येकाचेच नुकसान झाल्याने साऱ्यांनाच मदत मिळेल काय? असा सवाल शेतकऱ्यांनी केला

- संजय देशमुख 

जालना : यंदाचा साल गेल्या सालापेक्षा लई खराब चाललाय. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे. आता अधिकारी आणि कर्मचारी शेतात पंचनामे करीत आहेत. मात्र, प्रत्येकाचेच नुकसान झाल्याने साऱ्यांनाच मदत मिळेल काय? असा सवाल शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना केला. दानवेंसमोर आपल्या व्यथा मांडताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. 

दानवे यांनी मंगळवारी सकाळी जालना तालुक्यातील दरेगाव शिवारालगत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात येण्याचा आग्रह मंत्र्यांना केला. प्रारंभी दानवे यांनी कपाशी तसेच मका पिकांचे जे शेतात जास्त नुकसान झाले आहे. तेथे जाऊन पाहणी केली. एका महिला शेतकऱ्याने आम्ही ही जमीन गावातीलच एका शेतकऱ्याकडून भाडे पद्धतीने घेतली आहे, असे सांगितले. यावर दानवे यांनी संबंधित शेती मालक ढवले यांच्याशी चर्चा करून शेती कसणाऱ्या कुटुंबाला देखील शासकीय मदतीतून हिस्सा द्यावा, असे सांगितले. शेतातील पाहणी आटोपल्यानंतर दानवे यांनी दरेगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. 

यावेळी विष्णू पिवळ या तरूण शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रेरणा प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली.   पंचनामे ज्या प्रमाणे होतील, तशी नुकसान भरपाई सर्वांनाचा मिळेल अशी ग्वाही  दानवे यांनी यावेळी दिली. या दौऱ्याच्या वेळी कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, भास्कर दानवे, अशोक पांगारकर, देविदास देशमुख, सिद्धीविनायक मुळे आदींची उपस्थिती होती. 

बँक व्यवस्थापकाची घेतली झाडाझडती शेतकऱ्यांशी संवाद सुरू असतानाचा राज्य सरकारने दीड लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफी दिली आहे. ती किती जणांनी मिळाली, असे विचारल्यावर अनेकांनी ती मिळाली नसल्याचे सांगितले. त्यावेळी तुमची बँक कोणती असा सवाल दानवे यांनी करून थेट बँकेच्या अधिकाऱ्याला मोबाईलवरून संपर्क केला. यावेळी २८६ शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याचे बँक व्यवस्थापकाने सांगितले. त्यांच्याकडून दानवे यांनी मोबाईलचा स्पीकर आॅन करुन ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. अशांची यादीच वाचून घेतली. तसेच प्रशासनाने सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच त्या पोहोचल्यामुळे आम्हाला फटका बसला. (लीड कमी मिळाली) असे सांगून हशा पिकविला.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवे