सिनगांव जहाँगीर ठरतेय कोरोना हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:28 IST2021-02-20T05:28:36+5:302021-02-20T05:28:36+5:30
सिंगाव जहागीर येथे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून अचानकपणे कोरोनाबाधित रुग्ण निघू लागले. १६ फेब्रुवारीला एकाच दिवसात १५ कोरोनाबाधित रुग्ण ...

सिनगांव जहाँगीर ठरतेय कोरोना हॉटस्पॉट
सिंगाव जहागीर येथे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून अचानकपणे कोरोनाबाधित रुग्ण निघू लागले. १६ फेब्रुवारीला एकाच दिवसात १५ कोरोनाबाधित रुग्ण निघाले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तहसीलदार सारिका भगत यांनी आरोग्य विभागाच्या मदतीने तातडीने गावातच कोरोना चाचणी तपासणी शिबिराचे आयोजन केले. यावेळी बाधितांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात आली. सरपंच लता प्रकाश गीते, प्रकाश गीते, गजानन पवार, आदींनी तपासणीसाठी आवाहन केले. तालुका वैद्यकीय अधिकारी दत्ता मान्टे व त्यांच्या आरोग्य विभागातील चमूने दिवसभर रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तपासणी केली.
सूचनांचे पालन करावे
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी नियमित मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर वापर, आदी नियम पाळावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
सारिका भगत, तहसीलदार, देऊळगावराजा