शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

रेशीम कोष; ३९ हजारांचा विक्रमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:36 IST

जालना: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी सुरु झाली आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी सुरु झाली आहे. सोमवारी रेशीम कोषाला विक्रमी भाव मिळाला असून प्रती क्विंटल ३९००० हजार रुपयांचा दर मिळाला आहे. हा दर कर्नाटकातील रेशीम बाजारपेठेत मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या रेशीमकोष खरेदी केंद्र दिवसेंदिवस खरेदीचा उच्चांक गाठत आहे. सोमवारी येथील रेशीम कोषबाजारपेठेत मराठवाड्यासह विर्दभातील पंधरा शेतक-यांनी ९ क्विंटल रेशीम विक्रीस आणले होते. चांगला दर, शेतकºयासाठी विविध सुविधा, आणि तात्काळ पैसे मिळत असल्याने दिवसेदिवस बाजारात रेशीम कोषाची आवक वाढत आज झालेल्या खरेदी - विक्रीच्या व्यवहारात कर्नाटकातील रामनगरम येथील रेशीमकोष बाजारापेक्षा तब्बल साडेतीन हजार रुपये दर जास्त मिळाल्याने शेतक-यांनी आनंद व्यक्त केला. रामनगरम येथील बाजारपेठेत सोमवारी ३५ हजार ५०० रुपये चांगल्या प्रतीच्या रेशीम कोषाला भाव मिळाल्याची माहिती आहे.रेशीम विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २१ एप्रिल २०१८ पासून रेशीम कोष खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. आठ महिन्याच्या कालावधीत कालावधीत ६२० क्विंटल रेशीम कोषाची आवक झाली आहे. तब्बल १ कोटी ५२ लाख रुपयांची रेशीम कोषाची खरेदी करण्यात आली आहे. मराठवाड्यातील रेशीमकोष उत्पादक शेतक-यांना पूर्वी रेशीमकोष विक्रीसाठी कर्नाटक राज्यातील रामनगरम् येथे जावे लागत होते. भाषेची अडचण आणि वाहतुकीचा खर्च यामुळे रेशीमकोष उत्पादक शेतक-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतकºयांची अडचण ओळखून राज्यातील पहिली रेशीमकोष बाजारपेठ येथे सुरु करण्यात आली.कर्नाटक राज्यातील रामनगरम येथील रेशीम बाजारात देण्यात येणा-या विविध सुविधा येथील रेशीमकोष केंद्रात देण्यात येत आहे. तसेच कोषाला योग्य भाव देण्यात येत असल्याने मराठवाड्यासह विर्दभातील यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यांतील शेतकरी बाजार समितीत रेशीमकोष विक्रीस आणत आहेत. नगदी पीक म्हणून दिवसेंदिवस रेशीम कोष शेतीची ओळख वाढली आहे. शेतक-यांनी पारपंरीक शेतीला फाटा देत तुतीची लागवड करण्याकडे कल वाढला आहे.८ हजार हेक्टरवर रेशीम शेती करण्यात येत आहे.३९ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळालेले शेतकरी ज्ञानेश्वर मोरे, आणि व्यापारी इम्रान पठाण यांचा बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आल्यावेळी रजनीकांत इंगळे, मोहन राठोड, अनिल खंडाळे, प्रभाकर जाधव, अशोक कोल्हे, गजानन जºहाड, शुभम पवार, भरत जायभाये, कृष्णा कापरे आदींची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी