शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
4
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
5
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
6
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
7
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
8
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
9
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
10
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
11
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
12
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
13
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
14
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
15
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
18
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
19
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
20
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता

दर्शनासाठी गेलेली भावंडं परत आलीच नाहीत; २४ तासांनी शेततळ्यात सापडले तिघांचेही मृतदेह

By विजय मुंडे  | Updated: June 3, 2025 11:07 IST

बेपत्ता तिन्ही भावंडांचा शेततळ्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे

जाफराबाद (जि. जालना) : महादेवाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या तिन्ही भावंडांचा शेततळ्यात मृतदेह आढळला. ही घटना मंगळवारी सकाळी वरुड बुद्रुक (ता. जाफराबाद) येथे घडली. यश अनिल जोशी (वय १४), दिपाली रमण जोशी (वय ९), रोहन रमण जोशी (वय ७ रा. वरूड बुद्रुक) अशी मयतांची नावे आहेत.

वरूड बुद्रुक येथील जोशी कुटुंबातील तीन मुले सोमवारी सकाळी डोलखेडा रोडवरील महादेव मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दुपारपर्यंत मुले घरी आली नसली तरी ते मावशीकडे गेली असतील असा कायास पालकांनी बांधला. परंतु नंतरही मुले घरी न आल्याने पालकांनी नातेवाईकांकडे शोध घेतला. मुलांचा काहीच पत्ता लागत नसल्याने जाफराबाद पोलिस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. 

दरम्यान, नातेवाईक आणि पोलिसांकडून शोध मोहीम सुरू असतानाच मंगळवारी सकाळी तिन्ही भावंडांचा मृतदेह गावच्या शिवारातील एका शेततळ्यात आढळला. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :JalanaजालनाDeathमृत्यूAccidentअपघात