कामात दिरंगाई करणाऱ्या १५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:00 AM2019-12-23T00:00:49+5:302019-12-23T00:02:49+5:30

५० वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झालेल्या कामचुकार १५ कर्मचा-यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Show cause notice to 2 employees who have delayed work | कामात दिरंगाई करणाऱ्या १५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

कामात दिरंगाई करणाऱ्या १५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

Next
ठळक मुद्देसीईओ निमा अरोरा : कामात हलगर्जीपणा करणे भोवले

दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ५० वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झालेल्या कामचुकार १५ कर्मचा-यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कामात हलगर्जीपणा, वेळेवर उपस्थित न राहणे, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करणे, कामात दिरंगाई करणे, सोपवलेले काम विहित मुदतीत न करणे, परवानगी शिवाय गैरहजर राहणे, दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणे अशा विविध कारणांमुळे शासनास्तरावर माहिती सादर करण्यास विलंब लागतो. त्यामुळे ५० व ५५ वर्षं सेवा कालावधी पूर्ण झालेले अधिकारी व कर्मचारी कामचुकारपणा करीत असतील तर त्यांचे पुनर्विलोकन करून त्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याचे आदेश शासनाने सर्व शासकीय कार्यालयांना दिले आहे.
त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सर्व विभाग प्रमुखांना कामचुकार कर्मचाºयांच्या कामाचे मुल्यमापन करून त्याबद्दलचा पुनर्विलोकन अहवाल मागितला होता. यात विविध विभागातील १५ कर्मचारी ५० वर्ष सेवा कालावधी पूर्ण झाले आढळले व ते कामात दिरंगाई करत असल्याचे समोर आले. या सर्व कर्मचाºयांना सीईओंनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तीन ते चार दिवसात खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
संबंधितांचा खुलासा असमाधानकारक असल्यास किंवा खुलासा सादर न केल्यास त्यांना शासकीय सेवेतून सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे कामात दिरंगाई करणाºया कर्मचाºयांवर एक प्रकारे लगाम लागणार आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे कर्मचारी व अधिका-यांना आपली जबाबदारी व कामे विहित मुदतीत पूर्ण करावे लागणार आहेत.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी काही महिन्यांपूर्वीच कामचुकार अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई केली होती. यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाºयांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर काही दिवस सर्वच अधिकारी व कर्मचारी शिस्तबध्दपणे काम करत होते.
पाच कर्मचा-यांवर होऊ शकते कारवाई
मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी अधिकारी व कर्मचा-यांनी कामात हलगर्जीपणा करू नये, असे आदेश दिले होते. परंतु, तरीही काही कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचे सीईओंच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सदरील कर्मचाºयांच्या कामकाजाचा अहवाल माघितला.
दरम्यान, १५ कर्मचाºयांच्या कामकाजाचे मुल्यमापन केले असता, त्यातील पाच कर्मचाºयांचे काम असमाधानकारक असून, त्यांच्यावर मुदतपूर्व सेवानिवृत्तीची कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले.

कामात दिरंगाई करणाºया जवळपास १५ कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहे. खुलासा सादर न करणाºया व असमाधानकारक काम असलेल्या कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल.
-निमा अरोरा,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जालना

Web Title: Show cause notice to 2 employees who have delayed work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.