शॉर्टसर्किटमुळे बचत गटाचे दुकान जळाले; एक लाखाचे साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:43 IST2019-03-12T00:42:48+5:302019-03-12T00:43:34+5:30
किराणा आणि जनरल स्टोअर्स दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.

शॉर्टसर्किटमुळे बचत गटाचे दुकान जळाले; एक लाखाचे साहित्य खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील रेणुका माता महिला बचत गटा अंतर्गत लावलेल्या किराणा आणि जनरल स्टोअर्स दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.
बचत गटातील शीतल अनिल आखाडे यांनी किराणा व जनरल स्टोअर्स दुकान टाकले यासाठी रेणुका महिला बचत गटामार्फत त्यांनी किराणा आणि जनरल स्टोअर्सचे दुकान थाटले होते. यासाठी ग्राम संघ बचतगट व ग्रामसंघ जळगाव सपकाळ येथील गटाने १ लाख रुपयांचे आर्थिक सहकार्य केले होते. तसेच ग्रामसंघाकडून निधी मंजूर करण्यात आला परंतु काल रविवारी रात्री अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागून दुकानातील कलटरी आणि किराणा साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले. आपत्ती व्यवस्थापन निधीतून नुकसान भरपाई देण्याची मागणी बचत गटाच्या महिलांनी केली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच जि.प. सदस्या सुनीता शिवाजी सपकाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तलाठ्याला घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना केल्या.