खळबळजनक! जालन्यात जुन्या वादातून तरुणाचा भोसकून खून
By दिपक ढोले | Updated: June 26, 2023 23:54 IST2023-06-26T23:53:29+5:302023-06-26T23:54:33+5:30
खून करणारे तिघेजण असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत

खळबळजनक! जालन्यात जुन्या वादातून तरुणाचा भोसकून खून
जालना : एका तरुणाचा भोसकून खून करण्यात आल्याची घटना जालना शहरातील फुलबाजार भागात सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला आहे.
अक्षय पाटोळे, असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती डीवायएसपी सचिन सांगळे यांनी दिली. या हल्ल्यात अक्षय सोबत असलेला जय भंडारकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिनबापू सांगळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील अंबूलकर, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री या भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
दरम्यान, खून करणारे तिघेजण असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी सांगितले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.