जुना वाद उफाळून आला; जमावाने अचानक हल्ला करत भावंडांचा अंत केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 01:55 PM2020-09-04T13:55:18+5:302020-09-04T14:02:27+5:30

पोळा सणाच्या दिवशी राहुल गौतम बोर्डे याचा गावातील काही लोकांशी वाद झाला होता.

Shocking! From the old argument, the mob suddenly attacked and killed the siblings | जुना वाद उफाळून आला; जमावाने अचानक हल्ला करत भावंडांचा अंत केला

जुना वाद उफाळून आला; जमावाने अचानक हल्ला करत भावंडांचा अंत केला

Next
ठळक मुद्देमारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राहुल बोर्डे याचा जागीच मृत्यू गंभीर जखमी झालेल्या प्रदीप बोर्डे याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

जालना : जुन्या वादातून जमावाने अचानक हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रदीप गौतम बोर्डे (२३), राहुल गौतम  बोर्डे (२५ दोघे रा. पानशेंद्रा ता. जालना) या भावंडांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.

जालना तालुक्यातील पानशेंद्रा गावात पोळा सणाच्या दिवशी राहुल गौतम बोर्डे याचा गावातील काही लोकांशी वाद झाला होता. याच वादातून शुक्रवारी सकाळी जमावाने अचानक प्रदीप बोर्डे, राहुल बोर्डे या दोघांवर हल्ला केला. झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राहुल बोर्डे याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या प्रदीप बोर्डे याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, तालुका ठाण्याचे पोनि संजय लोहकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन १६ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Shocking! From the old argument, the mob suddenly attacked and killed the siblings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.