धक्कादायक ! कर्जमाफी यादीत नाव न आल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 19:12 IST2020-03-06T19:10:48+5:302020-03-06T19:12:22+5:30
शासनाने कर्जमुक्ती यादी जाहीर केली. मात्र, यादीत नाव न आल्याने नाव न आल्याने नवनाथ तौर हे निराश झाले होते.

धक्कादायक ! कर्जमाफी यादीत नाव न आल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
कुंभार पिंपळगाव : शासनाच्या कर्जमाफी यादीत नाव न आल्याने निराश झालेल्या एका शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथे शुक्रवारी सकाळी घडली.नवनाथ आप्पासाहेब तौर (३५) असे मयताचे नाव आहे.
शेतकरी नवनाथ तौर यांना गावच्या शिवारात शेती आहे. घरच्या शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबातील प्रश्न मार्गी लागत नसल्याने नवनाथ तौर हे इतरांच्या शेतात मजुरीने जात होते. त्यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे जवळपास दोन लाख रूपयांचे कर्ज होते. शासनाने कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर तौर यांना आपल्या डोक्यावरील कर्ज फिटेल ही आशा होती. शासनाने कर्जमुक्ती यादी जाहीर केली. मात्र, यादीत नाव न आल्याने नाव न आल्याने नवनाथ तौर हे निराश झाले होते.
शुक्रवारी सकाळी शेतात कामाला गेल्यानंतर त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील शेतकऱ्याने ही घटना समोर आल्यानंतर नातेवाईकांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, कुंभार पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर सायंकाळी मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे.