जालनेकरांचा ‘शिवशाही’ प्रवास लांबणीवर! ८ महिन्यांपासून बसची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:13 IST2017-12-21T00:12:24+5:302017-12-21T00:13:21+5:30
इतर जिल्ह्यात शिवशाही रस्त्यावर सुसाट धावत असताना जालनेकरांचा ‘शिवशाही’ प्रवास मात्र लांबणीवर पडला आहे. जालना जिल्ह्याला अद्यापही शिवशाही बस मिळाली नसल्याने जिल्ह्यातील प्रवासी आठ महिन्यांपासून शिवशाही बसची प्रतीक्षा करत आहे.

जालनेकरांचा ‘शिवशाही’ प्रवास लांबणीवर! ८ महिन्यांपासून बसची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : इतर जिल्ह्यात शिवशाही रस्त्यावर सुसाट धावत असताना जालनेकरांचा ‘शिवशाही’ प्रवास मात्र लांबणीवर पडला आहे. जालना जिल्ह्याला अद्यापही शिवशाही बस मिळाली नसल्याने जिल्ह्यातील प्रवासी आठ महिन्यांपासून शिवशाही बसची प्रतीक्षा करत आहे.
खाजगी वाहतुकीच्या स्पर्धेत एसटीने आपला दबदबा कायम ठेवत महामंडळाने ग्राहकांच्या सेवेसाठी वातानुकुलित शिवशाही बससेवा नुकतीच सुरू केली आहे. एसटी महामंडळाकडून दोन हजार बस टप्प्या-टप्प्याने विविध शहरात दाखल होत आहेत. जालना जिल्ह्याने आठ महिन्यापूर्वीच दहा शिवशाही बसची मागणी केली होती. मात्र मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड होत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातील प्रवासी शिवशाही बसचा आनंद घेत असताना जालनेकरांना बसचे दर्शनही झाले नाही.
‘आवडेल तेथे प्रवास’
शिवशाही बसला प्रवाशांचा मिळत असलेला प्रतिसाद बघता महामंडळाने शिवशाही बससाठी ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेअंतर्गत पास देण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेंर्तगत सात दिवसासाठी, चार दिवसासाठी शुल्क आकारले जाते. त्यानंतर महामंडळाने लग्न समारंभासाठी माफक दरात वातानुकुलित बस देण्याचा निर्णय घेतला आहे. जालना आगाराने मागणी केल्यानंतरही प्रतीक्षाच करण्याची वेळ आली आहे.