जिल्हाभरात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST2021-02-21T04:55:52+5:302021-02-21T04:55:52+5:30
जिल्हा परिषद शाळा, पारडगाव पारगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन ...

जिल्हाभरात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
जिल्हा परिषद शाळा, पारडगाव
पारगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक रवींद्र शिरसाठ, विलास ईरले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
व्हिजन इंग्लिश स्कूल
चंदनझिरा : जालना शहरातील सिद्धिविनायक नगर येथील व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये संस्थाध्यक्ष विलास सावंत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका स्वाती जाधव, शांतीलाल राऊत, विनोद कोल्हे, रमेश तुपे, लता सावंत, मुख्याध्यापिका नीता शिंदे आदी.
भिलपुरी ग्रामपंचायतीत अभिवादन
जालना : तालुक्यातील भिलपुरी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भाऊसाहेब नानासाहेब गोरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गणेश गोरे, अण्णासाहेब गायकवाड, पुंजाराम गोरे, नामदेव गोरे, सुधाकर लहाने, नरसिंग गोरे, ज्ञानेश्वर माउली, संतोष गोरे, दत्तात्रय गोरे आदी उपस्थित होते.
शिवजयंती उत्साहात साजरी
स्त्री रुग्णालयात कार्यक्रम
जालना : शहरातील स्त्री रुग्णालयात प्रतिमा पूजन करून अभिवादन करताना अधीक्षक डॉ. राजेंद्र पाटील, मनीष जाधव, डॉ. वानखेडे, डॉ. ठाकरे, वसंत राठोड, एजाज सिद्दिकी, शेलकर आदींची उपस्थिती होती.
फोटो
दावलवाडी येथे शिवजयंती साजरी
बदनापूर : तालुक्यातील दावलवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव जगताप, सरपंच वत्सलाबाई जाधव, उपसरपंच सुभाष जगताप, ग्रामपंचायत सदस्य गणेश जगताप, साईनाथ जाधव, उत्तम पवार, विवेकानंद जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री शिवाजीराव शेंडगे विद्यालय
चंदनझिरा : येथील श्री शिवाजीराव शेंडगे विद्यालयात मुख्याध्यापक बाळासाहेब आबुज, नगरसेवक गणेश राऊत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवप्रकाश चितळकर, बबन थोरात, डाॅ. विठ्ठल पालवे, कांतराव रांजनकर, शोभा काळे, उषा इंगळे, कृष्णा घाडगे, राहुल मुंडे, राजू साळवे आदींची उपस्थिती होती.