शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST2021-02-16T04:32:15+5:302021-02-16T04:32:15+5:30
त्याचप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा व कान्होजी नाईक जेधे यांचा इतिहास लेखन व संशोधन करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक विलास सोनवणे ...

शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर
त्याचप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा व कान्होजी नाईक जेधे यांचा इतिहास लेखन व संशोधन करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक विलास सोनवणे (सातारा) यांना ‘शिवराज्य भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘शिवसृष्टी प्रेरणा’ पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यात संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या साहित्यावर पीएच.डी करणारे डॉ.एकनाथ शिंदे (जालना), कोरोना काळात भरीव कामगिरी बजावणारे डॉ.स्वप्निल मंत्री (परतूर), शिवाजी महाराजांवर काव्य लेखन करणारे कवी मित्र शेख शब्बीर (सिल्लोड), ‘रांमळ्याच्या वाटा’ या समाज माध्यमावरील कवितेच्या सदरात विविधांगी कवितेचे सादरीकरण करणारी बालकवयित्री श्रावणी बरकुले (परतूर) यांचा समावेश आहे. मोरे परिवाराकडून देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण १९ फेब्रुवारी रोजी आमदार बबनराव लोणीकर, राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक सहदेव मोरे, डॉ.कल्याण मोरे यांनी दिली.