वरुड येथे विविध ठिकाणी शिवजयंत्ती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:56 IST2021-02-21T04:56:39+5:302021-02-21T04:56:39+5:30
आनंदनगर भागात प्रतिमापूजन जालना शहरातील आनंदनगर भागात प्रतिमापूजन करून अभिवादन करताना भीमाबाई बोरूडे, अनुराधा हेरकर, सीमा बोरूडे, सुरेखा बोरूडे, ...

वरुड येथे विविध ठिकाणी शिवजयंत्ती साजरी
आनंदनगर भागात प्रतिमापूजन
जालना शहरातील आनंदनगर भागात प्रतिमापूजन करून अभिवादन करताना भीमाबाई बोरूडे, अनुराधा हेरकर, सीमा बोरूडे, सुरेखा बोरूडे, ज्योती बोरूडे, सुरेश बोरूडे, संजय हेरकर, पूजा बोरूडे व इतर.
जिल्हा परिषद शाळा, सिंदखेड
जालना : सिंदखेड येथील जिल्हा परिषद शाळेत मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शामकुमार खांडेभराड, बबन जाधव, विष्णू मुंढे, अर्जुन डोईफोडे, रामेश्वर घनघाव, स्नेहलता निर्मळ यांनी यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.
गोलापांगरी येथे शिवजयंती साजरी
गोलापांगरी : जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच बाबासाहेब चांगुलपाये, ग्रामसेवक कोथळकर, बद्रीनारायण मोरे, ज्ञानेश्वर मोरे, शेखर मोरे, विजय गायकवाड, प्रमोद हातागळे, सदस्य अरुण जाधव, किशोर कावळे, राम मोरे, सुनील जाधव, गणेश गावडे, गजानन जाधव, आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद शाळा, तपोवन गाेंधन
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील तपोवन गोंधन येथील जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दमोता फलके, उपाध्यक्ष समाधान फलके, परसराम चौधरी, कुंडलिक चौधरी, मुख्याध्यापक दगडूबा देठे, नसीम शेख, विशाल फलके, महादू फलके, सुनील फलके, जगदीश फलके, रामेश्वर फलके, अमोल शिंदे, कृष्णा फलके, केशव फलके, अमोल हिवाळे, गोपाल गोफणे, निवृत्ती फलके, बाबासाहेब फलके, सार्थक फलके, सकलादी फलके, वैभव फलके, कैलास फलके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
धोपटेश्वर ग्रामपंचायतीत अभिवादन
बदनापूर : तालुक्यातील धोपटेश्वर येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच अश्विनी फुलमाळी, उपसरपंच नंदकिशोर दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य पाराजी दाभाडे, तारामती दाभाडे, गंगाधर दाभाडे, विजय कोल्हे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
मत्स्योदरी महाविद्यालयात अभिवादन
अंबड : शहरातील मत्स्योदरी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
प्रहार शिक्षक संघटनेकडून अभिवादन
जालना : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रमेश फटाले, गिरीधर राजपूत, सुरेश धानुरे, विलास वाघमारे, अमोल डोंबाळे, आदी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र, राणीउंचेगाव
राणीउंचेगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल बोने, डॉ. रोहित चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच विठ्ठल खैरे, बाळासाहेब शिंदे, नेत्र रोग विभाग डॉ. व्ही. व्ही. देशमुख, आरोग्य सहायक बी. बी. गायकवाड, आरोग्यसेवक व्ही. एच. लाड, पी. एम. शेख, ए. डी. पगारे, कर्मचारी डी. बी. उबाळे, एच. एन. टरले, अनिस पठाण, शबाना बेगम, उद्धव माने, मच्छिंद्र रायकर, गजानन शिंदे, कैलास तिकांडे, आदींची उपस्थिती होती.
रांजणी येथे शिवजयंती साजरी
रांजणी : घनसांवगी तालुक्यातील रांजणी येथील इंग्लिश स्कूल व नित्यानंद प्राथमिक विद्यालयात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष अमर देशमुख, प्राचार्य एस. के. मोटे, जी. एम. जाधव, ए. एन. पवार, इर्शाद अली उपस्थित होते. कॅप्शन : रांजणी येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करताना मान्यवर उपस्थित होते.