बेवारस सुटकेस आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:10 AM2019-03-01T01:10:22+5:302019-03-01T01:10:41+5:30

संभाजीनगर भागात बेवारस सुटकेस आढळून आल्याने शुक्रवारी खळबळ उडाली.

Sensation was found unavoidable | बेवारस सुटकेस आढळल्याने खळबळ

बेवारस सुटकेस आढळल्याने खळबळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील संभाजीनगर भागात बेवारस सुटकेस आढळून आल्याने शुक्रवारी खळबळ उडाली. बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे नागरिक व पोलिसांची तारांबळ उडाली होती.
जालना शहरातील संभाजीनगर भागातील अहिल्याबाई होळकर सभागृहाच्या मैदानावर बेवारस बॅग असल्याची अफवा नागरीकांमध्ये पसरली. या आफवेमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावारण पसरले होते. सदर बातमी पसरताच बॉम्ब नाशक पथक व भोकरदन नाका चौकी चे पथक घटनास्थळी तातडीने पोहचून बेवारस बॅगेची तपासणी केली, आसता, बॅगमध्ये दवाखान्याचे काही साहित्य व डॉक्टरची ची किट असल्याचे निष्पन्न झाले. बॅगमध्ये बॉम्ब सारखी संवेदनशील वस्तू नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे अवाहन बॉम्ब शोधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एस. एल. वैष्वव यांनी यावेळी केले.

Web Title: Sensation was found unavoidable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.