शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेथअ‍ॅनलायझरद्वारे तळीरामांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 00:03 IST

तळीरामांची ब्रेथ अ‍ॅनलायझरद्वारे तपासणी करून कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : होळी, रंगपंचमीसह इतर सण, उत्सव सर्वांनी शांततेत साजरे करावेत. होळी, रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तळीरामांची ब्रेथ अ‍ॅनलायझरद्वारे तपासणी करून कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी दिला.शहरातील सदरबाजार पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री खिरडकर यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी पोनि संजय देशमुख, पोनि लोहकरे, पोनि महाजन, मित्तल, स्वातंत्र्य सैनिक दायमा यांची प्रमुख उपस्थिती होती.होळी, रंगपंचमीसह इतर सणाची लगबग सुरू आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी दुष्काळ अनुभवला आहे. त्यामुळे रंगांची उधळण करताना पाण्याचा जपून वापर करावा. शक्य झाल्यास फुलांची उधळण करावी. सण- उत्सवाला गालबोट लागू नये, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, कायदा हातात घेणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही खिरडकर यांनी यावेळी दिला. यावेळी नरेंद्र मित्तल, सुभाष देविदान, ओमप्रकाश शिंदे, संतोष क-हाळे, इलियास लखारा, पारस यादव, सय्यद मुश्ताक, अंकुश राऊत, ज्ञानेश्वर कवळे, अफसर चौधरी, सुशील गौड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :HoliहोळीJalna Policeजालना पोलीसliquor banदारूबंदी