शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

२३ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 1:05 AM

राज्य शासनाने नव्यानेच सुरु केलेल्या महाडीबीटी पोर्टलव्दारे२०१८ -२०१९ या शैक्षणिक वर्षात तब्बल २३ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात २३ कोटी रुपयांची रक्कम विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालयाच्या बँकखात्यात आॅनलाईन वर्ग करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाने नव्यानेच सुरु केलेल्या महाडीबीटी पोर्टलव्दारे२०१८ -२०१९ या शैक्षणिक वर्षात तब्बल २३ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात २३ कोटी रुपयांची रक्कम विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालयाच्या बँकखात्यात आॅनलाईन वर्ग करण्यात आली. यामुळे बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्तीची रक्कम लाटणाऱ्यांना लगाम लागला आहे.अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या वतीने शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०१८ ते २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील १२ हजार ७७ विद्यार्थ्यांनी शासनाच्या महाडीबीटी आॅनलाईन पोर्टलवर नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांची कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर त्यापैकी ९ हजार ९१ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले होते. त्यापैकी ८ हजार ३६४ विद्यार्थ्यांना १० कोटी ३५ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. तर इतर मागास प्रवर्गातील १४ हजार ८१६ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ९३९ विद्यार्थ्यांना १२ कोटी ६५ लाख रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. अनेक महाविद्यालये बोगस विद्यार्थी दाखवून कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्तीची रकमेचा अपहार करत होती. यामुळे गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ होत नव्हता. तसेच शासनाच्या तिजोरीवर सुध्दा मोठा भार पडायचा. शिष्यवृत्ती वाटपात सुध्दा पारदर्शकता नव्हती. यामुळे राज्य शासनाने शैक्षणिकवर्ष २०१८ पासून महाडीबीटी आॅनलाईन पोर्टल सुरु केले आहे.या पोर्टलवर विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करावा लागतो. आधारकार्डसह विविध शैक्षणिक तसेच महाविद्यालयाची माहिती भरावी लागते.आॅनलाईन अर्जामुळे बोगसगिरीला आळा बसला असून पात्र लाभार्थ्यांना याचा चांगला लाभ होत आहे. तसेच विद्यार्थ्यांची महाविद्यालयाची फीस, तसेच इतर शुल्क महाविद्यालयाच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.सुरुवातील या महाडिबीटी पोर्टवर आॅनलाईन अर्ज करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक वेळा साईड हळू चालत असल्याने विद्यार्थ्यांना मुदतीत अर्ज करण्यात अडचणी आल्या होत्या. यामुळे विद्यार्थी, पालकांनी संताप व्यक्त केला होता.यामुळे शासनाने विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी चारवेळेस मुदत वाढ दिली होती. ९ जुलै पर्यंत महाविद्यालयांनी मंजूर केलेल्या १६०० विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे आॅनलाईन पाठविण्यात आलेले आहे.लवकरच सुरु होणार महाडीबीटी पोर्टलशैक्षणिक वर्ष २०१९- २०२० यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी महाडिबीटी पोर्टल लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे समाजकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीgovernment schemeसरकारी योजना