शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

संजना जैस्वालची मॉस्को क्रॉसबो स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:16 IST

जालन्यातील संजना वीरेंद्र जैस्वाल हिने अत्यंत हटके क्रीडा प्रकारावर आपले लक्ष केंद्रीत केले असून, आता पर्यंत अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धेत कास्य, रौप्य आणि सुवर्ण पदक मिळविले आहे. आता संजनाची निवड ही नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चँपिअन स्पर्धेसाठी भारती संघात निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील संजना वीरेंद्र जैस्वाल हिने अत्यंत हटके क्रीडा प्रकारावर आपले लक्ष केंद्रीत केले असून, आता पर्यंत अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धेत कास्य, रौप्य आणि सुवर्ण पदक मिळविले आहे. आता संजनाची निवड ही नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चँपिअन स्पर्धेसाठी भारती संघात निवड झाली आहे.या स्पर्धेची तयारी संजनाने आतापासून चालविली असून, मॉस्कोत सुवर्णपदक मिळविण्याचे आपले लक्ष्य असल्याने तिने लोकमत शी बोलताना सांगितले.शालेय जीवनापासूनच एअर रायफल क्रीडा प्रकारात तरबेज असलेल्या संजनाने नंतर तिचे करिअर हे क्रॉसबो क्रीडा प्रकारात करण्याचे ठरवले. क्रॉसबो हा क्रीडा प्रकार खूप खर्चिक आहे. त्यासाठी लागणारे आयुध - क्रीडा साहित्य हे अत्यंत खर्चिक आहे. असे असतानाही मला मात्र, महाराष्ट्र क्रॉसबो असोसिएशनने यासाठी मोलाचे सहकार्य केल्यानेच आपण येथपर्यंत पोहोचू शकल्याचे संजनाने आवर्जुन सांगितले. यापूर्वी संजनाने आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेले आहे.नुकत्याच या राष्ट्रीय पातळीवर क्रॉसबो स्पर्धा उत्तर प्रदेश मधिल इटावा येथे पार पडल्या. त्या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंची मॉस्कोत होणाºया जागतिक क्रॉसबो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यासाठी संजनाला चंद्रमोहन तिवारी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे तिने सांगितले. या क्रॉसबो क्रीडाप्रकाराकडे आपण पंजाबमधील मित्रांच्या माध्यमातून वळलो असून, आता मॉस्कोत होणा-या स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक आणणने हे आपले व आई-वडिलांचे स्वप्न असल्याचे ती म्हणाली. तसेच पुढीलवर्षी देखील वर्ल्ड क्रॉसबो चॅम्पियन स्पर्धा होणार असून, त्यासाठी मॉस्कोच्या स्पर्धा महत्वाच्या ठरणार असल्याचे सांगण्यात आले.बोमियाच्या माध्यमातून एकाग्रताक्रॉसबो या क्रीडा प्रकारात १८ आणि ३५ मीटर अंतरावरून लक्ष्य साध्य करावे लागते. तीन मिनिटात तीन संधी यासाठी दिल्या जातात. एकूण ३२ शॉटस् खेळण्याच संधी असते. या क्रीडा प्रकारात जी एअररायफल असते, ती चालविण्यासाठी तुमच्या खांद्याच्या आणि पायाच्या मसल्समध्ये मोठी ताकद लागते. यासाठी नियमितपणे व्यायाम तसेच आहारावर नियंत्रण आणि मनाची एकाग्रता महत्वाची ठरते. एकाग्रतेसाठी योगसाधना सोबतच बोमिया या नवीन व्यायाम प्रकाराच्या माध्यमातून हे साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संजनाने सांगितले.

टॅग्स :Sportsक्रीडाShootingगोळीबार