शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

रोटरी, इनरव्हील, रोटरॅक्टचा पदग्रहण सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:45 AM

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी माणसाने कायम आशावादी जीवन जगावे, असे प्रतिपादन रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ. स्मिता लेले यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी माणसाने कायम आशावादी जीवन जगावे, असे प्रतिपादन रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ. स्मिता लेले यांनी केले.रोटरी क्लब आॅफ जालना सेंन्ट्रलचा पदग्रहण समारंभ नुकताच मधुर बँक्वेट येथे उत्साहात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. स्मिता लेले, रोटरीचे उपप्रांतपाल भरत जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नूतन अध्यक्ष वीरेंद्र देशपांडे, सचिव विवेक मेहता यांनी मावळते अध्यक्ष डॉ. स्वप्नील बडजाते यांच्याकडून पदभार स्वीकारला. लेले म्हणाल्या, आपल्याला आयुष्यात ज्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्या अडचणींची इतरांना झळ बसू नये, यासाठी माणसाने प्रयत्नशील राहावे, असेही त्या म्हणाल्या.नूतन अध्यक्ष वीरेंद्र देशपांडे यांनी नवीन कार्यकारिणी समितीची ओळख करुन दिली. मावळते अध्यक्ष डॉ. स्वप्नील बडजाते आणि सचिव सागर कावना यांनी केलेल्या कामाचा आढावा सदर केला. इनरव्हील सेन्ट्रलच्या नूतन अध्यक्षा संगीता मोतीवाला तसेच सचिव ममता पंजाबी यांनी आपल्या नूतन कार्यकारिणीसह पदभार स्वीकारला. मावळत्या अध्यक्ष स्मिता जैन यांनी मनोगत व्यक्त केले. रोटरॅक्ट सेन्ट्रलचे नूतन अध्यक्ष पीयूष गादिया आणि सचिव मयुरी लड्डा यांनी पदभार स्वीकारला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. अभय सोनी आणि डॉ. सोनाली जेथलिया यांनी केले.

टॅग्स :Rotary Clubरोटरी क्लबSocialसामाजिकWomenमहिला